Category Archives: Uncategorized

दुधोंडी

पश्चिमेला संथ वाहते कृष्णामाईचा नयनरम्य परिसर, पूर्वेला सर्व जगामध्ये नावाजलेला किर्लोस्कर कारखान्याचा परिसर दक्षिणेला हिरवीगार ऊस शेती व उत्तरेला ऐसपैस पसरलेल्या सहयाद्रीच्या रांगा हया सर्व निसर्गरम्य पसरलेले दुधोंडी गाव साधुसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले स्वातं-याच्या चळवळीत हिरीरीने भाग घेणारे गावातील स्वातंय सैनिक पहिलवानांची परंपरा असलेले गाव गुणी कलावंताचे व कलाकारांचे वैभव लाभलेले शैक्षणिक परंपरा असलेले व उज्वल परंपरा धार्मिक अधिष्ठान असलेले हे दुधोंडी गाव.

काळी गावाच्या उत्तरेला सहयाद्री पर्वत रांगाच्या कुशीत सागरेश्वर देवस्थान वसले आहे. कौंडिण्य–पूर चा राजा शिकारीसाठी तेथे आला. दिवसभर शिकारीच्या शोधात वणवण भटकला परंतु त्याला शिकार मिळाली नाही. थकून भागून तो एका वृक्षाखाली बसला घामाने चिंब झाला होता समोर निर्मल पाण्याचे कुंड दिसले त्यात त्याने आंघोळ केली त्याबरोबर त्याला प्रसन्न वाटले एक नवचैनन्य मिळाल्या सारखे वाटले आनंदाने तो राजवाडयात आला ती रात्रही त्याला आनंदात गेली कारण राणी साहेबही आनंदात होत्या राजाने त्यांना आनंदाचे कारण विचारले राणी साहेबानी त्यांना प्रतिप्रश्न केला की तुम्ही आज दिवसभर कोठे होता व दिवसभरात काय काय केले म्हणजे मग माया आनंदाचे कारण सांगते तेव्हा राजाने दिवसभराचा कार्यक्रम सांगितला व सागरेश्वरच्या कुंडात स्नान केल्याचे सांगितले व त्यामुळे अंगात चैतन्य निर्माण झाल्याचे सांगितले तेव्हा राणी वदली खरोखर सागरेश्वर आपल्याला पावला आहे राजा म्हणाला असे का म्हणतेस तेव्हा राणी म्हणाली मला अभय द्या मग सांगते राजाने राणीला अभय दिले.