विविध योजना

  1. राज्य सरकारच्या विविध योजना राबवण्यामध्ये गाव नेहमी सतर्क असते गावामध्ये यशवंत ग्राम समृध्दी योजना सलग 3 वर्षे मंजूर झाली.
  2. त्यामधून गावातील सर्व अंतर्गत रस्ते व गल्लीमधील रस्ते कॉंक्रीटीकरण केलेले आहेत. वाडी वस्ती व गावठाणामध्ये इंधन विहीरी मधून लोकांना पाण्याची सोय करुन दिलेली आहे.
  3. गणेशनगर व कदमवस्तीसाठी भारत निर्माण योजनेतून वस्तीसाठी पाणीपुरवठा करुन तेथील गैरसोय दूर केली. तसेच वसंतनगर या भागासाठी भारत निर्माण योजनेतून पाणीपुरवठा करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
  4. विविध योजनेतून गाव निर्मलग्राम करण्यासाठी 60 शौचालये बांधण्यात येवून गाव हांगणदारीमुक्त केलेले आहे.