रोजगाराची

स्वयंरोजगार–

  1. गावामध्ये बाळासाहेब दांड व दिलीप दांड या बंधूनी शेंगदाणा चिक्की, खोबरे चिक्की, बफर्ी तसेच राजीगरा इत्यादी उत्पादने करुन बाजारामध्ये विक्री करतात.
  2. शेवई, मसाला, मिरची कांडप कडधान्य शिवणक्लास इ. व्यवसाय महीला उत्तम प्रकारे करतात.
  3. बचत गटाच्या माध्यमातून मेणबत्ती, खडू, खाद्य पदार्थ तसेच लिज्जत पापड यासारखे व्यवसाय महीला करतात.
  4. गावामध्ये द्रोण पन्नावळी व छोटया डिशेस तयार करण्याचे दोन कारखाने आहेत.
  5. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन शेळीपालन, ससेपालन तसचे नर्सरी इ. व्यवसाय मोठया प्रमाणावर चालू आहे.
  6. गावातील अनेक तरुण जीप, टेम्पो, सहा आसनी रिक्षा ते माल वाहतुक घेवून ते स्वयंपूर्ण झाले आहेत.

उद्योग–

  1. गावामध्ये चप्पल करण्याचे चार कारखाने आहेत. येथील चप्पल टिकावू असल्यामुळे आसपास खेडयातील लोंकांची मागणी आहे
  2. फॅब्रीकेशनचे तीन प्रकल्प आहेत.
  3. खत सेंटर, सिमेंट विक्री असल्यामुळे ट्रान्सपोर्टाचा व्यवसायही मोठया प्रमाणात आहे.