राजकीय व्यक्तिमत्वे

 • कै.स्वामी रामानंद भारती परम पुज्य स्वामी–
  • गावच्या प्रगतीचा ध्यास असणारे हे व्यक्तीमत्व ते परगावाहून दुधोंडी येथे येवून आश्रम स्थापन केले तसेच ते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमीटीचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा कॉग्रेस कमीटीचे जिल्हाध्यक्ष होते कै वसंतदादा पाटील कै. यशवंतराव चव्हाण व राजाराम बापू पाटील हे त्यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्य करीत होते. त्यांचे प्रेरणेने दुधोंडी येथे शिवभवानी उत्सवास प्रारंभ झाला.
 • कै रामाचंद्र जोतीराम जाधव–
  • गावाच्या प्रगतीसाठी झुंजणारे सामाजिक कार्यकर्ते गावामध्ये त्यांनी 1960 साली भारती शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. तसेच ते दुधोंडी गावचे सरपंच म्हणून 10 वर्षे त्यांनी काम पाहिले, त्यांचे कारकिर्दीमध्ये दुधोंडी गावामध्ये विज विद्युतीकरण करण्यात आले.
 • कै विठ्ठल तात्याची साळुंखे–
  • दुधोंडी गावातील शेतकयांची जाणीव असणारे कार्यकर्ते त्यांनी दुधोंडी येथील 450 एकर जमीनीत पाणी उपलब्ध करुन दिले शिवाजी जलसिंचन योजना 1 ची स्थापना केली.
 • कै किसन बंडू जाधव व बाबूराव रावजी नलवडे–
  • शिवाजी जलसिंचन योजना नं 2 ची स्थापना करुन त्यांनी 450 एकर क्षेत्र पाण्याखाली आणले.
  •  कै गोविंद केशवराव देशमुख–सन 1910 मध्ये दुधोंडी ग्राम विकास सोसायटीची स्थापना केली या सोसायटी माफर्त पीक कर्जे, वाहन कर्जे इ. व इंधन पुरवठा तसेच रासायनिक खते धान्य पुरवठा केला जातो.
 • पांडुरंग बापू मगर–
  • तासगावं मार्केट कमीटीचे सभापती होते तसचे दुधोंडी गावचे सरपंच 1958–84 या काळामध्ये होते.
 • आनंदराव पांडुरंग नलवडे–
  • दुधोंडी गावचे आदर्श सरपंच म्हणून त्यांची ख्याती आहे त्यांनी गावामध्ये विकासाची विविध कामे केली.
 • कै दत्तात्रय मारुती आरबुते–
  • दुधोंडी ग्राम विकास सोसायटीचे 10 वर्षे चेअरमन होते तसेच दुधोंडी ग्रामपंचायतीने सरपंच होते प्रशासन कारभारामध्ये उत्तम कार्येकर्ते होते.
 • सौ. निर्मला जर्नादन जाधव–
  • विद्यमान जिल्हा परिषद सदस्या व प्रगतीचा ध्यास असणारे व्यक्तिमत्व.
 • शिवाजी बापू मगर–नाना–
  • किर्लोस्कर कामगार इंटक युनियनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ते स्वामी रामानंद भारती सुतगिरणी तासगांव चे संचालक म्हणून कार्यरत आहेत तसेच ते राजाराम बापू बॅंक लि. चे ते विद्यमान संचालक आहेत ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहे. वसंत–यशवंत उद्योग समुहाचे संस्थापक शिवाजीरव मगर पाटील हे आहेत.
 • प्रकाश शंकर आरबुते–
  • गावचे माजी सरपंच गावच्या विकासासाठी नेहमीच अग्रगन्य असतात त्यांनी त्याचे करकिर्दीत विकासाची भरपूर कामे केली. ते तंटामुक्ती गाव समीती अध्यक्ष आहेत.
 • भालचंद्र बाबुराव आरबुते–
  • सांगली जिल्हा सहकार बोर्डाच्या संचालक पदी ते कार्यरत आहे. कृष्णा ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था दुधोंडी चे विद्यमान अध्यक्ष.
 • विजय आरबुते व रमेश बाबुराव भातमारे–
  • पलुस तालुका कृषी बाजार समितीचे विद्यमान संचालक म्हणून कार्यरत आहेत.
 • शिवाजीराजे कृष्णाजी जाधव.
  • शिवभवानी विकास सोसायटीचे संस्थापक चेअरमन तसेच पोपट भिमराव जाधव व भवानी ग्रामिण बिगर शेती पतसंस्था दुधोंडीचे संस्थापक आहेत.
 • कै रामचंद्र आण्णाजी आरबुते–
  • माजी नगराध्यक्ष सांगली व माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत.