वैशिष्टपूर्ण व्यक्तीमत्व

जे. के. जाधव

सर्वात महत्वाचा व जिव्हाळयाचा प्रश्न म्हणजे जे.के. जाधव आर्थिक सुबत्ता त्यादृष्टीने दुधोंडी हे कृष्णा काठचे सधन गाव परंतु बागायती व पिकाचे क्षेत्र कमी शेती आर्थिक विवंचना लक्षात घेवून गावचे सुपुत्र जे.के. जाधव यांनी शेतकयांच्या व गोरगरिबांच्या कल्याणासाठी 10–12 वर्षापूर्वी मानसिंग को–ऑप बॅंकेची स्थापना केली.

सुरुवातीला बापूंनी सर्वांना धक्काच दिला सांगली सारख्या जिल्हयाच्या ठिकाणी त्यांनी शाखा काढली व तिही अविरत 365 दिवस चालू आणि आज ती बॅंक प्रगती प्रथावर आहे व उत्तम चाललेली आहे. त्याचप्रमाणे पुढील वर्षी पलूस व विटा येथे शाखा काढून आपली घौडदौड चालू ठेवली. बॅंक शाखेबरोबर छोटया छोटया पतसंस्था ही काढल्या व त्याही यशस्वीरित्या चालविल्या. तसेच कृष्णाकाठ दुधउत्पादन संस्था कृष्णाकाठ शेती माल प्रक्रिया संस्था आणि अशा अनेक संस्था त्यांनी कार्यान्वित केल्या व यशस्वी केल्या.

महिलांच्यासाठी सुध्दा सोसायटी स्थापन केली. आज शेकडो महिला त्याचा लाभ घेत आहेत. प्रत्येक हाताला काम देणे हे बापूंचे ब्रीद वाक्य आहे बापू सारखा धडाडीचा नेता लाभल्यावर तेथे कशाची वाण पडणार बापू म्हणजे दुधोंडीचे भूषणच आहेत. त्याच धडाडीने त्यांनी विकास सोसायटींच्या माध्यमातून एवढया छोटयाशा गावात सीमा रेषेवर पेट्रोलपंपही चालू केला या सर्व माध्यमातून व प्रगतीतून आपल्या हे लक्षात येईल की तेथे पाहिजे जाताचे एरा गबाळयाचे काम नोव्हे आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्यांची धर्मपत्नीची पुण्याई असते. त्यांच्या पत्नीही त्यांच्याप्रमाणेच धडाडीच्या कार्यकत्र्या व जिल्हा परिषद सदस्या आहेत.

कृष्णा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्या दुधोंडी ची स्थापना जे.के. बापू यांनी केली.

भारत निर्माण योजनेसाठी मा.जे.के. जाधव यांनी विशेष प्रयत्न करुन गावाच्या विकासासाठी ही योजना मंजुर केली तसेच वसंत नगर भागासाठी प्रस्ताव प्रगतीपथावर आहे.

राजाराम बापू पाटील बॅंक. लि. पेठ चे संचालक म्हणून बरेच वर्षे काम पहिले, तासगांव तालुका सह साखर कारखानाचे ते संचालक होते.

रयत शिक्षण संस्थेच्या आजीव सदस्यपदी ते कार्यरत आहेत.

कै. मिनाताई जाधव चॅरीटेबल ट्रस्ट चे ते संस्थापक आहेत. या ट्रस्ट माफर्त गावासाठी एंम्ब्युलन्सची सोय करुन दिलेली आहे.

कृष्णाकाठ शेतीमाल प्रक्रिया व साठवणूक संस्था मर्या दुधोंडी यांचे संस्थापक जे.के. जाधव यांनी डी. हायड्रेशन प्रकल्पांस मंजुरी आणली असुन थोडया दिवसात तो प्रकल्प उभा राहणार आहे.

इंदिरा महीला विकास सोसायटीची स्थापना मा.जे.के. जाधव यांनी केली. सांगली जिल्हयामध्ये महीला सोसायटी व्यवस्थीत कारभार करणारी एकमेव सोसायटी आहे.