सुविधा

आरोग्य सुविधा–

 • दुधोंडी गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. या उपकेंद्राची स्थापना 1965 ला झाली.
 • या उपकेंद्रामाफर्त हिवताप माताबाल संगोपन क्षयरोग नियंत्रण कुष्ठरोग निमुर्लन अंधत्व निवारण कुटुंब नियोजन लसीकरण यासारखे कार्यक्रम राबविले जातात.
 • प्राथमिक उपचारांबरोबर महीलांची प्रस्तुती केली जाते.
 • तसेच मुख्य आरोग्य केंद्राची मदतीने बिनटाक्यचे ऑपरेशन केले जाते.
 • शालेय विद्याथ्र्यांची आरोगय तपासणी किशारे वयोगटातील मुलींची आरोग्य तपासणी औषधोपचार आणि सल्ला दिला जातो.
 • जन्म मृत्यू बालमृत्यू नोंदणी केली जाते घरोघरी भेट देवून साथीच्या रोगाचे सर्वेक्षण केले जाते.
 • पिण्याच्या पाण्याची नमुन्यांची तपासणी केली जाते.
 • पल्स पालिओ जंतनाशक आरोग्य शिबीरांचे आयोजन केले जाते.
 • गावात आरोगय दिन साजरा केला जातो.
 • गावात खाजगी पाच दवाखाने आहेत. यामध्ये विविध प्राकरच्या आजारांवर उपचार केले जातात.
 • गावात तीन औषधी मेडीकल्स आहेत.