आठवडे बाजार

गावातील व कामानिमित्त रोजगार करण्यासाठी आलेल्या लोकांची दररोजच्या गरजांची व भाजीपाल्यांची सोय व्हावी म्हणून दर बुधवारी बाजार भरतो. गावातील व्यापायाप्रमाणे बाहेरगावचे व्यापारीही आपल्या मालाची विक्री करण्यासाठी येतात. बाजार दुपारी 3 ते रात्री 8 पर्यंत भरतो. फळे, भाजीपाला, कांदा बटाटा कपडे घरगुती वापरासाठी लागणारी भांडी कडधान्ये धान्ये मिठाईची दुकाने आदिची दुकाने सजलेली असतात. त्यामुळे खरेदीदारांची गर्दी असते.