शैक्षणिक सुविधा

दुधोंडी गावात 8 अंगणवाडया, मुलींची शाळा 1. मुलांची शाळा व 1 माध्यमिक विद्यालय आहे. गावातील छत्रपती शिवाजी विद्यालय ही माध्यमिक शाळा आदर्शशाळा म्हणून सर्व जिल्हयात प्रसिध्द आहे. तिला लागोपाठ 3 वेळा विकास चॅरिटेबल ट्रस्ट किर्लोस्करवाडी कडून पुरस्कार मिळाला आहे. सर्वशिक्षा अभियानतर्फे व शिक्षणप्रेमी नागरिकांनी लोकवर्गणीतून शाळा नं.1 व शाळा नं.2 आदर्शवत केल्या आहेत. या तिनही शाळातील विद्याथ्र्यांना शुध्द पाणी पिण्यास मिळावे म्हणून विकास चॅरिटेबल ट्रस्टने स्वखर्चाने प्युरिफायर यंत्र व टाक्या बसवून दिल्या आहेत. त्यामुळे जवळ जवळ 1 ते 1।। हजार विद्याथ्र्यांना व जवळच्या नागरिकांना त्याचा चांगला फायदा होत आहे येथील छत्रपती शिवाजी विद्यालय.

हे एक नामांकित विद्यालय आहे याची स्थापना 1960 साली झाली. खास करुन मुलींचा शिक्षणाच्या दृष्टीने ते आवश्यक होते 48 वर्षापूर्वीचा तो काळ मुलींना शाळेत पाठवायला लोक तयार नसत. मुले मात्र 7 वी नंतर कुंडलच्या हायस्कूलमध्ये जावून शिक्षण घेत मुली मात्र शिक्षणापसून वंचित राहिल्या. काही शिक्षणप्रेमी नागरिकांनी आपल्या मुली शिक्षणासाठी पाठविण्याची तयारी दर्शविली व हे हायस्कूल सुरु झाले.

सुरवातीला 7 मुलींवर सुरुवात झाली आज मात्र ती संख्या 260–70 वर गेली आहे. शिक्षणाबरोबर व्यायाम व खेळाची आवड येथे निर्माण केली जाते. प्रशस्त क्रीडांगण आहे. या शाळेचे विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत विभागीय पातळीपर्यंत गेले आहेत. कुस्ती ही केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिली नाही. या क्षेत्रातही या शाळेच्या मुली आघाडीवर आहे .या शाळेची विद्यार्थिंनी कु.आस्मा मुजावर ही 57 किलो गटात विभागापर्यंत गेली आहे. तर पुजा पाटील ही जिल्हा पातळीपर्यंत गेली आहे. कबड्डी, खो-खो, रनिंग, रिले, थाळीफेक, भालाफेक यामध्येही जिल्हा पातळी गाठली आहे. या शाळेचे व गावचे विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर कॉम्प्युटर इंजिनियर, बी.टेक, एम.टेक अशा अत्युच्य पदव्या धारण केलेले आहेत.

ग्रामपंचायत दुधोंडी प्राथमिक शाळांची स्वच्छतागृह माहीती–

शाळेचा प्रकार–               मुलींसाठी मु.सं. मुलींसाठी शौ.सं. मुलांसाठी मु.सं. मुलांसाठी शौ.सं.

मुलांची शाळा नं.1                     —                     —                   21                  3          

मुलींची शाळा नं.2                     17                     3                      —                 —        

मुलांची शाळा वसंतनगर              3                     1                       3                   1         

मुलांची शाळा गणेशनगर             2                     1                       2                    —        

मुलांची शाळा शेरे दुधोंडी             2                     1                       2                     —     

 ग्रामपंचायत दुधोंडी माध्यमिक शाळेची स्वच्छताग्रह माहीती–

  • शाळेचा प्रकार–छत्रपती शिवाजी विद्यालय.
    • मुलींसाठी मुतारी संख्या 14, मुलींसाठी शौ. संख्या 3, मुलांसाठी मुतारी संख्या 16, मुलांसाठी शौ. संख्या 3.